ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“दोनच राजे येथे….. कोकण पुण्यभूमीवर… रायगड ते महाड ‘शिवराय ते भीमराय’ समता मार्च”
चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्षानिमित्त १७ ते २० मार्च दरम्यान समतेचा ऐतिहासिक मार्च; छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा संदेश देण्यासाठी १९ मार्चला महाडमध्ये समता परिषद

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
महाड |
समतेच्या विचारांचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा आवाज पुन्हा एकदा रायगडाच्या पायथ्यापासून महाडच्या चवदार तळ्यापर्यंत घुमणार आहे. “रयतेच्या आणि समतेच्या राज्यासाठी शिवराय ते भीमराय समता मार्च” हा ऐतिहासिक मार्च १७ ते २० मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. “जिंदाबाद साथीनो!” या घोषणेसह समतेचा संदेश पुन्हा एकदा रायगड ते महाड मार्गावर दुमदुमणार आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून किल्ले रायगड ते चवदार तळे, महाड असा हा समता मार्च काढला जात असून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या, न्यायाच्या आणि मानवमुक्तीच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यंदा या मार्चाला विशेष ऐतिहासिक संदर्भही लाभला आहे. कारण २० मार्च २०२६ रोजी महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाला तब्बल ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. समतेच्या इतिहासातील या महत्वाच्या टप्प्याची आठवण ठेवत हजारो कार्यकर्ते आणि नागरिक या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचा आढावा
१७ मार्च – पाचाड येथे मुक्काम
१८ मार्च – रायगड दर्शनानंतर समता मार्चला प्रारंभ, तसेच समता इफ्तार
१९ मार्च – दुपारी ४ वाजता महाड शहरात भव्य रॅली सायं. ५ वाजता गाडीतळ येथे समता परिषद
दरम्यान, १९ मार्च रोजीची समता परिषद हा मुख्य कार्यक्रम मानला जात असून या परिषदेला तुषार गांधी, लक्ष्मीकांत देशमुख आणि प्रज्ञा दया पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या समता मार्चमध्ये नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समतेच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




