ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
“टीव्हीके नावामागचा खरा गेम : ‘विजय’ नव्हे… आंबेडकर + पेरियार विचारांचा कोड!”
नाव, ब्रँडिंग आणि आयडियॉलॉजीचा संगम — डीएमकेचा पारंपरिक बालेकिल्ला हादरवणारी नवी रणनीती

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
तमिळनाडूच्या राजकारणात “तमिळगा वेट्री कळगम (Tamilaga Vettri Kazhagam-TVK)” हे नाव फक्त एक नवीन पक्ष म्हणून समोर आलेलं नाही, तर ते एक खोल राजकीय कोड, कॅलक्युलेटेड ब्रँडिंग आणि आयडियॉलॉजिकल संदेश आहे. थलपती विजय यांनी हे नाव निवडताना केवळ “विजय” हा सरळ अर्थ मांडला नाही, तर सामाजिक न्याय, समता आणि बदलाची नव्याने मांडणी लोकांसमोर ठेवली. या एका नावानेच डीएमकेच्या पारंपरिक राजकीय भूमिकेला थेट आव्हान दिलं, आणि त्याच वेळी जनतेत आधीपासून साचलेली नाराजी या नव्या पर्यायाकडे वळू लागली.
पहिल्या नजरेत टीव्हीके हे नाव साधं वाटतं, पण त्यातील प्रत्येक शब्द हा एक ठरवून दिलेला राजकीय संदेश आहे. “Vettri” म्हणजे केवळ निवडणूक जिंकणं नव्हे, तर जनतेच्या विजयाचा संकेत आहे. “Tamilaga” स्थानिक अस्मिता अधोरेखित करतो, तर “Kazhagam” हा शब्द पक्षापेक्षा चळवळीचा अर्थ देतो. त्यामुळे TVK हे नाव एकाच वेळी भावना, ओळख आणि चळवळीचा संगम बनतं. या ब्रँडिंगमुळे ते सहज लक्षात राहतं, सोशल मीडियावर वेगाने पसरतं आणि विशेषतः तरुण मतदारांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करतं.
या नावामागची खरी ताकद मात्र त्याच्या आयडियॉलॉजीमध्ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानता, सामाजिक न्याय आणि हक्कांच्या विचारांना “Vettri” या शब्दातून एक नवीन राजकीय अर्थ मिळतो—तो म्हणजे वंचित, दलित आणि मागास समाजाच्या विजयाचा संदेश. दुसरीकडे, पेरियार ई. व्ही. रामासामी यांच्या ड्रविडियन विचारसरणीचा वारसा “Kazhagam” या शब्दातून पुढे नेला जातो, जो चळवळ, सामाजिक क्रांती आणि तर्कवाद दर्शवतो. या दोन्ही विचारांचा संगम म्हणजेच TVK—एक कोडेड मेसेज, जो थेट सांगितला जात नाही, पण मतदारांच्या मनात खोलवर पोहोचतो.
याच ठिकाणी डीएमकेसाठी खरी अडचण निर्माण होते. कारण डीएमकेने वर्षानुवर्षे सामाजिक न्याय आणि पेरियार विचारांवर आपला ठसा ठेवला होता. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप, घराणेशाही, तिकीट वाटपातील नाराजी, जुन्या जाणत्याना वगळणं आणि वाढती अँटी-इन्कंबन्सी यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला. लोकांना वाटू लागलं की सत्ता लोकांसाठी नसून सत्ताधाऱ्यांसाठी वापरली जाते. अशा वेळी टीव्हीकेने त्याच विचारांना नवीन चेहरा आणि आक्रमक सादरीकरण दिलं, ज्यामुळे डीएमकेचा “मोरल हाय ग्राउंड” कमकुवत झाला.
या बदलामागे थलपती विजय यांचा वैयक्तिक प्रभावही तितकाच महत्त्वाचा ठरला. सिनेमातील “जनतेसाठी लढणारा हिरो” ही त्यांची इमेज राजकारणात सहज ट्रान्सफर झाली. त्यांच्या मोठ्या फॅन बेसने हळूहळू राजकीय कॅडरचं रूप घेतलं, ज्यामुळे टीव्हीकेला ग्राउंड लेव्हलवरही ताकद मिळाली. तरुण मतदारांना नवीन चेहरा, स्पष्ट भूमिका आणि आक्रमक नेतृत्व हवं होतं आणि ते विजयमध्ये दिसलं.
याशिवाय टीव्हीकेने आपला नॅरेटिव्ह अत्यंत स्पष्ट आणि साधा ठेवला. बदल हवा, सामाजिक न्याय हवे आणि नवीन नेतृत्व हवं. या थेट संदेशामुळे मतदार गोंधळले नाहीत, उलट ते अधिक वेगाने या विचारांशी जोडले गेले. सोशल मीडियावर प्रभावी वापर, व्हायरल कॅम्पेन आणि डिजिटल एंगेजमेंटमुळे हा संदेश जलद गतीने पसरला, ज्यात पारंपरिक पक्ष मागे पडले.
टीव्हीकेने सामाजिक समीकरणांवरही अचूक काम केलं. दलित, वंचित, मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात अल्पसंख्याक मतदारांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे हा पक्ष केवळ एका वर्गापुरता मर्यादित न राहता व्यापक आधार तयार करू शकला. लोकांना जुन्या पक्षांपासून वेगळा, फ्रेश आणि नॉन-कॉम्प्रोमाइजिंग पर्याय हवा होता टीव्हीकेने तो दिला.
एकंदरीत पाहिलं तर, टीव्हीकेचा विजय हा एका मुद्द्याचा परिणाम नाही. तर डीएमकेविरोधातील साचलेली नाराजी, विजयचा वैयक्तिक प्रभाव, मजबूत नॅरेटिव्ह, डिजिटल रणनीती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकर–पेरियार विचारांचा कोडेड संदेश या सगळ्यांचा एकत्रित संगम आहे. टीव्हीके हे नाव केवळ “विजय” दर्शवत नाही, तर ते एक राजकीय दिशा दाखवतं, वंचितांचा आवाज, सामाजिक न्यायाची नव्याने मांडणी आणि विचार तेच ठेवून नेतृत्व बदलण्याची तयारी.
शेवटी चित्र एकदम स्पष्ट आहे टीव्हीके म्हणजे पक्ष नाही, तर एक संदेश आहे: “विचार तेच… पण नेतृत्व नवीन कोर करकरीत !”




