ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अशोक खरात प्रकरण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील “एपस्टीन फाइल्स” ; रूपाली चाकणकरांनी तातडीने राजीनामा द्यावा – शिवराज्य ब्रिगेडचे महासचिव शैलेश चव्हाण यांची मागणी 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  |
नाशिकमधील बहू चर्चित अत्याचार प्रकरणात आरोपी कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज्य ब्रिगेडचे महाराष्ट्राचे महासचिव शैलेश चव्हाण यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
शैलेश चव्हाण यांनी म्हटले आहे की, “या प्रकरणात काही व्हिडिओ आणि फोटो समोर आल्याने नैतिकतेच्या आधारावर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.” अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
त्यांनी पुढे असेही सांगितले की, महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीकडून उच्च नैतिक मूल्यांची अपेक्षा असते. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप समोर आल्यास निष्पक्ष चौकशीसाठी पद सोडणे आवश्यक आहे.
चव्हाण म्हणाले की, “या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली तर ‘महाराष्ट्रातील एपस्टीन फाइल्स’मधून धक्कादायक आणि मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. यात अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येऊ शकतात.”
या विधानामुळे राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी नव्हे तर व्यापक नेटवर्कच्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे.
या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी तसेच पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेच्या विरुद्ध राज्यामध्ये सर्वकाही घडत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे. स्वराज्याच्या विरोधात ज्यांनी कोणी षडयंत्र रचले त्यांचा शिवाजी महाराजांनी नायनाट केला आहे याचा विसर कोणीही पडू देऊ नये, असा इशारा शिवराज्याभिगेडचे जिल्हाध्यक्ष आकाश राणे यांनी दिला. रूपाली चाकणकर यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर तातडीने राजीनामा द्यावा. आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button