“शरीर ओरडत नाही… ते हळूच बिल पाठवतं!”

भाग ३ – नेचरोपॅथी (निसर्गोपचार)
आजचा माणूस इतका धावतोय की थांबायला विसरलाय. काम, ताण, अपेक्षा आणि मोबाईल यामध्ये तो इतका गुंतलाय की शरीर काय सांगतंय, याकडे लक्ष द्यायला वेळच उरलेला नाही. थकवा झाला तरी पुढेच धावायचं, दुखणं आलं तरी दुर्लक्ष करायचं—हीच आजची सवय झाली आहे. सारळ, अलिबाग येथील मानसशास्त्रीय निसर्ग समुपदेशक मिलिंद अनंत पाटील यांच्या मते निसर्गोपचार म्हणजे मोठे बदल नाहीत, तर रोजच्या आयुष्यात थोडंसं थांबणं, थोडंसं ऐकणं आणि शरीराशी पुन्हा मैत्री करणं होय. कारण शरीर कधी लगेच ओरडत नाही, पण दुर्लक्ष झालं की ते आपली भाषा वेदनांमधून बोलू लागतं.
————————————
मंडळी, आपलं शरीर फार गोड असतं.
ते कधीच रागावत नाही.
आपण उशिरा झोपू, जंक फूड खाऊ, ताण घेऊ, पाणी विसरू
ते शांतपणे एकच वाक्य म्हणतं—
“चालेल… पण एक दिवस मी तुला बिल देईन!”
आणि ते बिल?
SMS नाही…
थेट दुखणं, थकवा, अॅसिडिटी, ताण!
मग आपण म्हणतो
“का रे बाबा, असं काय होतंय?”
शरीर म्हणतं
“माहिती आहे… तू माझ्याशी तीन दिवस बोललाच नाहीस!”
नेचरोपॅथी शरीराला एक संधी देते
“अरे, पुन्हा मैत्री करूया!”
निसर्गोपचार काय सांगतो
थोडं चालून जा
थोडं हसा
थोडं झोपा
थोडं कमी खा
आणि थोडं जास्त जगून बघा
पण आपल्या आयुष्यात “थोडं” नावाचं बटणच नाही!
किंवा खूपच… किंवा अजिबातच नाही!
पाणी पिण्याचं ठरवतो…
आणि २४ तासांनी आठवतं!
पाणी बघून म्हणतो
“ओळख आहे, पण सध्या व्यस्त आहे!”
मग शरीर म्हणतं
“ठीक आहे… मग मी तुझं डोकं दुखवतो!”
नेचरोपॅथी विचारायला सांगते
“मी नैसर्गिक आहे का सिंथेटिक?”
आज
आवाज अलार्मचा
ताजेपणा फिल्टरचा
हसू इमोजीचं
शांतता सायलेंट मोडची
आणि मन? थकलेलं!
निसर्गोपचार म्हणजे“
जरा थांब… स्वतःकडे वळ.”
आजच एक प्रयोग करा
५ मिनिटं गवतावर उभं राहा.
काही बोलू नका.
फक्त पायाखालचा स्पर्श ऐका.
अंतर्मन म्हणेल “धन्यवाद… खूप दिवसांनी भेटलास!”.
…..
– मिलिंद अनंत पाटील, सारळ, अलिबाग
“मानसशास्त्रीय निसर्ग समुपदेशक”
📞 9404791798
….




