ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडमधील २००४ च्या खून प्रकरणातील फरार आरोपी अटकेत


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |
रायगड जिल्ह्यातील २००४ मधील खून प्रकरणात २१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पेण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मनोज अशोक पांडव (वय ४९, रा. पनवेल, नवी मुंबई), असे अटक केलेल्या  आरोपीचे नाव आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २० मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मयत प्रसाद गणेश ठाकूर (वय ३४, रा. घेरा सागरगड, वडवली, ता. अलिबाग) यांच्या खूनाचा गुन्हा फिर्यादी गणेश नागेश ठाकूर वय वर्ष 69 यांच्या फिर्यादीवरून २ एप्रिल २००४ रोजी दाखल करण्यात आला होता. घटनेपूर्वी आरोपीची बकरी ही फिर्यादीच्या कंपाऊंडमध्ये मृत अवस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी मयताने न्यायालयात केस दाखल केली होती, ज्यामुळे दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते.
या वैमनस्यातून आरोपींनी १ एप्रिल २००४ रोजी मध्यरात्री ते २ एप्रिल २००४ रोजी सकाळी दरम्यान वडवली गावाजवळील ताडाच्या झाडाजवळ ठाकूर यांना अडवून तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्यातील आरोपी जयप्रकाश उर्फ जयेश जगन्नाथ म्हात्रे (रा. उसर्ली, ता. पनवेल) याच्याविरुद्ध यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तसेच या प्रकरणातील साथीदार आरोपी मनोज अशोक पांडव (वय ४९, रा. पनवेल, नवी मुंबई) हा घटनेनंतर फरार होता.
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत पनवेल येथून १६ मार्च २०२६ रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
….

Related Articles

Back to top button