ताज्या बातम्यादेश विदेश
‘इंडिया आऊट’ म्हणणाऱ्या मुइझ्झूंना अखेर भारताच्याच काठीचा आधार, चीनची उघडीपणे होतेय बेअब्रू!
भारतावर टीका करत सत्ता मिळवली, पण आता तग धरण्यासाठी भारताचाच हात धरावा लागला; चीनने दाखवली खरी औकात

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
चीनच्या जवळीक साधण्याच्या नादात मुइझ्झूंनी देशाला कर्जाच्या दलदलीत ढकलले. आणि आता संकटाचा सामना करताना हात पुढे करणारा देश कोण? – भारत.
मालदीवला आधार देणारा भारत दिसतोय, तर चीन मात्र मौन धरून बसलाय.
म्हणजेच, “इंडिया आऊट” म्हणणाऱ्या मुइझ्झूंनाच आज भारताशिवाय पर्याय उरलेला नाही.

परकीय चलन साठ्याचा धोकादायक स्तर
दक्षिण आशियातील छोटासा पण रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा देश मालदीव सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. देशाचा परकीय चलन साठा कोसळून फक्त 188 दशलक्ष डॉलर्स इतकाच शिल्लक राहिला आहे – म्हणजे अवघ्या एका महिन्याच्या आयातीसाठी पुरेसा. याचबरोबर परदेशी कर्जाचे ओझे इतके वाढले आहे की 2025 मध्ये 600 दशलक्ष डॉलर्सवरून 2026 मध्ये ते तब्बल 1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
पर्यटनावर अवलंबित्वाची किंमत
मालदीवची अर्थव्यवस्था अतिशय प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. कोविड-19 महामारीनंतर जागतिक पर्यटन कोसळले, आणि आता भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली. परिणामी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशाचा ऋण-जीडीपी प्रमाण 110 ते 116 टक्क्यांच्या वर गेले आहे, तर एकूण कर्ज 8 ते 9.4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.

भारताची मदत – चीनची थंड प्रतिक्रिया
या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुढाकार घेत मालदीवला दिलासा दिला आहे. 50 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाची परतफेड एका वर्षासाठी स्थगित करून त्यावरील व्याजही माफ केले आहे. मात्र चीनकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा आलेली नाही. भारताने मदतीचा हात पुढे केला, आणि चीन मात्र थंड बसला.

मुइझ्झूंचा यू-टर्न
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू सुरुवातीपासूनच चीन समर्थक मानले जात होते. सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकांना हद्दपार करण्याचे आदेश दिले, भारताने दिलेली हेलिकॉप्टर, विमाने व गस्ती नौका बंद पाडल्या. “इंडिया आऊट” अशा घोषणाही दिल्या. पण परिस्थितीने त्यांनाही झुकायला भाग पाडले.
जुलै महिन्यात पंतप्रधान मोदी मालदीवला गेले तेव्हा मुइझ्झूंचा सुर पूर्णपणे बदललेला दिसला. आता ते भारताशी संबंध सुधारण्यास प्राधान्य देत आहेत.




