ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
पॅरोल की गुन्ह्यांना परत मोकळं रान? मंत्री आदिती तटकरे संतप्त”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
राज्यात बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषी आरोपी पॅरोलवर बाहेर येऊन पुन्हा गुन्हे करत असल्याच्या धक्कादायक वास्तवावर अखेर सत्तेतूनच आवाज उठला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी थेट प्रश्न उपस्थित करत पॅरोल व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
“अशा नराधमांना पुन्हा समाजात येऊ देणं म्हणजे महिलांच्या सुरक्षेला धोका नाही का?” असा थेट सवाल करत, अशा गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देऊ नये, अशी कठोर मागणी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.
मागील काही प्रकरणांमध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपींकडून पुन्हा गंभीर गुन्हे घडल्याच्या घटनांनी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेतला जात असल्याचीही चर्चा रंगत असून, यामुळे पॅरोल प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा गुन्हेगारांवर कायमस्वरूपी निर्बंध आणण्याची गरज असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. “सुधारणा” या नावाखाली पुन्हा गुन्हे करण्याची संधी मिळत असेल, तर त्या व्यवस्थेचा फेरविचार करणे गरजेचे आहे, असा सूरही त्यांनी लावला.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत विधी व न्याय विभागाला कायद्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे देखील उपस्थितीत होते.
……




