ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थेट संघर्ष! रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर कुरुळ ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : सहा महिन्यांपासून रस्त्यांच्या दुर्दशेकडे कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाविरोधात अखेर कुरुळ ग्रामपंचायतीने थेट बंड पुकारले आहे.
23 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत, अलिबाग बायपास कॉर्नर ते कुरुळ या महत्त्वाच्या मार्गाच्या प्रश्नावर प्रशासनाच्या अपयशावर अत्यंत ठाम आणि आक्रमक ठराव मंजूर करण्यात आला.
हा ठराव म्हणजे केवळ तक्रार नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर लावलेला ठपका असल्याची तीव्र भावना ग्रामसभेत व्यक्त झाली.
रस्ते नाहीत, मृत्यूचे सापळे आहेत!
या मार्गावर खोल खड्डे, उखडलेले डांबर, पावसात साचणा रे पाणी यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण, महिला व ज्येष्ठ नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामसभेचा ठराव : प्रशासनाला जाब विचारण्याची अधिकृत भूमिका
ग्रामसभेत एकमताने ठरवण्यात आले की,
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास, पुढील आठवड्यात संपूर्ण ग्रामस्थ उपोषण व रास्ता रोको आंदोलन करतील. हा ठराव म्हणजे लोकशाही मार्गाने प्रशासनाविरोधात उचललेले कठोर पाऊल असून, ग्रामपंचायतीनेच शासनाला जबाबदार धरण्याची भूमिका घेतल्यामुळे या ठरावाचे राजकीय व प्रशासकीय महत्त्व मोठे मानले जात आहे.
ठरावाची प्रत सर्व यंत्रणांना
हा ठराव ग्रामपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी रायगड,  रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती अलिबाग, अलिबाग पोलीस ठाणे
सवाल थेट, उत्तर कोण देणार?
ग्रामसभेचा ठरावही प्रशासनाला हलवू शकत नसेल, तर लोकांनी न्याय मागायचा तरी कुठे?
कुरुळ ग्रामपंचायतीचा हा ठराव म्हणजे इशारा आहे आता शांत बसणार नाही!  रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनआंदोलन अटळ आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य एडवोकेट प्रसाद पाटील यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button