ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
अंगावर रोमांच… डोळ्यांत अभिमान… गावात परतला देशाचा वीर!
सेवानिवृत्त सैनिक रोहन तटकरे यांचे गवळीवाडी, गोंधळपाडा ग्रामस्थांच्यावतीने जल्लोषात स्वागत

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
ढोल-ताशांचा कडकडाट सुरू होता… तिरंगा अभिमानाने आकाशात फडकत होता… आणि गावाच्या वेशीवर हजारो डोळे एका क्षणाची वाट पाहत होते…तो क्षण आला… आणि सगळ्यांच्या अंगावर एकाच वेळी रोमांच उभे राहिले!
रोहन तटकरे… नाव साधं… पण कथा असामान्य!
गरीब कुटुंबातून निघालेला हा मुलगा… स्वप्न पाहिलं देशासाठी लढण्याचं! आणि ते स्वप्न फक्त पाहिलं नाही… तर जिद्दीने पूर्ण केलं!
जम्मू-काश्मीरच्या थंड वाऱ्यांत, सियाचिनच्या गोठवणाऱ्या बर्फात…जिथं श्वास घेणंही अवघड होतं… तिथं हा जवान उभा राहिला…

कारण त्याच्या मनात एकच ज्वाला होती देशप्रेमाची! 20 वर्षं…हो, पूर्ण 20 वर्षं त्याने स्वतःला देशासाठी झोकून दिलं! गोळ्यांच्या सावटाखाली, मृत्यूच्या छायेत…पण एक पाऊलही मागे घेतलं नाही! आणि आज…तोच वीर जेव्हा आपल्या गावात परतला…तेव्हा आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते…पण ते दु:खाचे नव्हते… ते होते अभिमानाचे!
पत्नीच्या चेहऱ्यावर समाधान होतं…आणि गावकऱ्यांच्या घोषणांनी आकाश दणाणून गेलं
“जय जवान! भारत माता की जय!” फुलांची उधळण होत होती…ढोल-ताशांचा नाद हृदयात धडकत होता…आणि प्रत्येकाला एकच भावना जाणवत होती “हा आपल्या गावाचा नाही… हा देशाचा हिरो आहे!” महिलांनी औक्षण केलं… फटाक्यांनी आकाश उजळलं…
पण त्या सगळ्या गोंगाटातही एक शांत सत्य स्पष्ट होतं. आपण सुरक्षित आहोत… कारण असे जवान सीमारेषेवर उभे आहेत! रोहन तटकरे यांच्या शब्दांनी तर सगळ्यांच्या भावना उचंबळून आल्या.

“देशसेवा हे माझं कर्तव्य होतं… पण गावकऱ्यांचं हे प्रेम आयुष्यभर विसरणार नाही!” त्या क्षणी…
कोणाच्याही अंगावर काटा आला नाही असं होणंच अशक्य होतं! कारण, ही फक्त एका जवानाची कथा नव्हती… ही होती देशभक्तीची जिवंत ज्वाला!




