ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
समाजकारणाची प्रेरणा देणाऱ्या मीनाक्षीताईंच्या स्मरणार्थ अलिबागमध्ये वक्तृत्व स्पर्धा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : समाजकारणाला आयुष्य वाहिलेल्या आणि जनतेच्या मनात घर करून गेलेल्या माजी राज्य मंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता शेेतकरी भवन, अलिबाग येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक व वक्ते सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत.

स्व. मीनाक्षीताईंचे कार्य आणि त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ होत असलेल्या या स्पर्धेतून युवकांना विचारांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन पुरोगामी विद्यार्थी संघटना रायगड, पुरोगामी युवक संघटना आणि सांस्कृतिक सेल, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.




