ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
इतर राज्यांतील विजयाचा अलिबागमध्ये जल्लोष; भाजपचे शक्तीप्रदर्शन, पुढील लढाईचे संकेत

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
पश्चिम बंगाल, आसाम तसेच इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाचा आनंद अलिबाग शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करून तसेच जोरदार घोषणा देत विजयाचा जल्लोष केला. या जल्लोषातून केवळ आनंद व्यक्त करण्यात आला नाही, तर स्थानिक पातळीवर पक्षाचे शक्तीप्रदर्शनही पाहायला मिळाले.
या वेळी नगरसेवक अॅड. अंकित बांगेरा, अलिबाग शहराध्यक्ष राजेश प्रधान, युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील गाडे, सुनील दामले, निखिल चव्हाण, जयेश पवार, कोटियन, इफ्तिकार अत्तर, पेरेकर, आदित्य जैन, आदित्य नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा आनंद व्यक्त करत भविष्यातही पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या विजय जल्लोषातून स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद दाखवण्याबरोबरच भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी हा जल्लोष महत्त्वाचा मानला जात आहे.




