ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“दुर्गंधीवर थेट हल्ला! प्रभाग १७५ मध्ये गणेश साठे यांच्या पाठपुराव्याला यश” 

बीएमसीने तातडीने तक्रारीची दखल घेत सुरू केली स्वच्छता मोहीम


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई  |
प्रभाग क्र. १७५ मधील जय महाराष्ट्र नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. सर्वत्र पसरलेल्या कचऱ्यामुळे आणि तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले होते, तसेच त्यांच्या आरोग्यावरही मोठा धोका निर्माण झाला होता. परिसरातील ही बिकट अवस्था पाहून स्थानिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती.
याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्ष (खोरीया) चे कार्यकर्ते गणेश चंद्रकांत साठे यांनी ही समस्या गांभीर्याने घेत थेट मनपा एफ/उत्तर विभागाकडे धाव घेतली. त्यांनी केवळ तक्रार करून थांबण्याऐवजी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनावर दबाव निर्माण केला आणि तात्काळ कारवाईची ठाम मागणी लावून धरली.
गणेश साठे यांच्या या आक्रमक आणि प्रामाणिक पाठपुराव्याचा परिणाम अखेर दिसून आला. बीएमसी प्रशासनाने परिस्थितीची दखल घेत संबंधित ठिकाणी तातडीने स्वच्छता मोहिम सुरू केली. कचरा हटविणे आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून परिसरात स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे.
ही कारवाई केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मिळालेला एक मोठा दिलासा मानला जात आहे. गणेश साठे यांच्या प्रयत्नांमुळे “आपल्यासाठी कोणी तरी लढत आहे” ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रभाग स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी अशाच प्रकारे काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत गणेश साठे यांनी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली आहे.

Related Articles

Back to top button