ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

दबाव की स्वेच्छा? रूपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई  |

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने दिला असल्याचे स्पष्ट केले असले तरी, नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर वाढलेला राजकीय दबाव हेही यामागचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. या प्रकरणात महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपला राजीनामा सादर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महिला आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील अध्यक्षा नियुक्तीबाबत सरकारकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Related Articles

Back to top button