ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“रायगडच्या भविष्यास नवे बळ : रोजगारावर लक्ष केंद्रीत करणारा तिसरा प्रकल्प”


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

रायगड : जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येला उपाय म्हणून जे.एस.डब्ल्यू कंपनीचा प्रस्तावित तिसरा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ रोजगाराच्या संधीच निर्माण होणार नाहीत तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासालाही गती मिळणार आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी या प्रकल्पाला जाहीर पाठिंबा देत सांगितले की, “स्थानिक युवकांच्या हितासाठी आम्ही नेहमीच लढा दिला आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्याच्या भविष्यास नवे बळ मिळेल. स्थानिक सुशिक्षित युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”
या प्रकल्पातून लघुउद्योग, सेवा क्षेत्र, परिवहन आणि इतर पूरक व्यवसायांना प्रोत्साहन मिळून उद्योजकतेलाही चालना मिळणार आहे. त्यामुळे तरुणाईला केवळ नोकरीच नव्हे, तर उद्योजकतेचीही नवी दारे उघडण्याची संधी मिळेल.
राजा केणी यांनी स्पष्ट केले की, “रायगड जिल्ह्यातील बेरोजगारी संपवायची असेल तर औद्योगिक प्रकल्पांची गरज आहे. डिप्लोमा, डिग्री आणि आयटीआय धारक पदवीधर युवकांना रोजगार देणे ही काळाची गरज आहे. हा प्रकल्प उभारल्याने स्थानिकांच्या हाताला काम मिळेल आणि आर्थिक स्तरही उंचावेल.”
रोजगार हा या प्रकल्पाचा केंद्रबिंदू असल्याने स्थानिक पातळीवर प्रचंड उत्सुकता व पाठिंबा दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button