ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचा ‘ग्लोबल व्हिजनरी अवॉर्ड’; रायगडच्या सात जणांचा सन्मान


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

हरियाणा : “विकसित भारत व्हिजन २०४७” या संकल्पनेला समर्पित “ग्लोबल व्हिजनरी अवॉर्ड २०२५” हा भव्य कार्यक्रम अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ५ ऑक्टोबर २०२५ रोजी करनाल (हरियाणा) येथे संपन्न झाला.

या सोहळ्यात नॅशनल चिफ सेक्रेटरी धनंजय प्र. म्हात्रे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया मार्फत केलेल्या जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अलिबाग तालुक्यातील सात जणांना “ग्लोबल व्हिजनरी अवॉर्ड २०२५” ने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये धनश्री धनंजय म्हात्रे (स्टेट चेअर पर्सन, महाराष्ट्र), प्रिया कर्णिक (डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन, रायगड), श्रद्धा वैद्य (डिस्ट्रिक्ट लीगल अॅडव्हायझर, रायगड), नरपतसिंग राजपुरोहित (स्टेट चिफ अॅडव्हायझर, महाराष्ट्र), उज्ज्वला चंदनशिव (स्टेट चिफ डायरेक्टर, महाराष्ट्र), मिलिंद मगर (तालुका जनरल सेक्रेटरी, अलिबाग) आणि नेहा गायकवाड (तालुका चिफ डायरेक्टर, अलिबाग) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे सुप्रिमो व राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र अरोरा, सुप्रसिद्ध सिने अभिनेता शाबाज खान, सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी तसेच देशभरातील मान्यवर आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय म्हात्रे हे मागील आठ वर्षांपासून फाउंडेशनचे कार्य देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला.


Related Articles

Back to top button