ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
पुणे |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) चा निकाल उद्या, शुक्रवार दिनांक ८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे :
results.digilocker.gov.in⁠
mahahsscboard.in⁠
sscresult.mkcl.org⁠
results.navneet.com⁠
विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालासह गुणपत्रिकेची प्रिंट काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयातील गुणांची पडताळणी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. त्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button