ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
दोनशे वर्षांचा सुवर्णवारसा आता अलिबागमध्ये; चंदुकाका सराफ ज्वेल्सचा उद्या भव्य शुभारंभ!
परंपरेसोबत आधुनिक दागिन्यांचे कलेक्शन; शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
दोनशे वर्षांचा सुवर्णवारसा आता अलिबागमध्ये; चंदुकाका सराफ ज्वेल्सचा उद्या भव्य शुभारंभ
अलिबाग : दोनशे वर्षांचा विश्वासाचा वारसा, शुद्धता आणि दर्जाची परंपरा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स आता अलिबागकरांच्या सेवेत दाखल होत आहे. अलिबाग-पेण रोडवरील जिओ पेट्रोल पंपासमोर चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या नव्या दालनाचा भव्य शुभारंभ रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे अलिबागच्या सराफा बाजारपेठेत एका नामांकित आणि ऐतिहासिक ब्रँडची भर पडणार आहे.
१८२७ पासून विश्वासाचा सुवर्णप्रवास
चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या प्रवासाची सुरुवात १८२७ मध्ये बारामती येथे झाली. छोट्या स्वरूपातील सुवर्णकार व्यवसायापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक पिढ्यांच्या मेहनतीने आणि ग्राहकांच्या विश्वासाने विस्तारत गेला. शुद्धता, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार दागिने या मूल्यांवर उभ्या राहिलेल्या या पेढीने महाराष्ट्राच्या दागिने क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज दोनशे वर्षांच्या या वारशाला आधुनिक डिझाईन्स, हिरे, चांदी तसेच दैनंदिन वापरासाठीच्या दागिन्यांची जोड मिळाली असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ ब्रँडच्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतो.
परंपरेपासून आधुनिकतेपर्यंत दागिन्यांचे भव्य कलेक्शन
आजच्या ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन चंदुकाका सराफ ज्वेल्सकडून पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांसोबत आधुनिक डिझाईन्स, डायमंड ज्वेलरी, सिल्व्हर ज्वेलरी आणि विविध प्रसंगांसाठी आकर्षक कलेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. लग्नसमारंभ, सण-उत्सव, वाढदिवस, वर्धापनदिन किंवा स्वतःसाठीची खास खरेदी अशा प्रत्येक प्रसंगासाठी ग्राहकांना विविध पर्याय मिळणार आहेत.
शुभारंभानिमित्त खास ऑफर्स
अलिबाग दालनाच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांवर मजुरी फक्त ३.९९ टक्के ते ९.९९ टक्के प्रति ग्रॅम, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट, तर चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. ही विशेष शुभारंभ ऑफर १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
दोनशे वर्षांचा वारसा घेऊन अलिबागमध्ये होत असलेले हे नवे दालन ग्राहकांसाठी केवळ दागिने खरेदीचे ठिकाण न राहता, परंपरा, विश्वास आणि आधुनिक दागिन्यांच्या जगाचा नवा अनुभव देणारे ठरण्याची अपेक्षा आहे.
…..



