ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

ठाणे-पालघरमध्ये ४९४१ घरगुती ग्राहक झाले सौरऊर्जेवर स्वावलंबी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

कल्याण, दि. २५ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ४९४१ वीज ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वावलंबीपणा मिळवला आहे. योजनेत आता ९५०० अर्ज मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत. ठाण्यात दररोज १८.६५ मेगावॅट आणि पालघरमध्ये ८.४७ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.

३ किलोवॅट क्षमतेसाठी शासनाकडून ७८,००० रुपये अनुदान मिळते. निवासी घरांसाठी १ किलोवॅटवर ३० हजार रुपये अनुदान आहे, तर संस्था व रहिवासी संघटनांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी १८,००० रुपये प्रति किलोवॅट मिळतात. महावितरणच्या वतीने नेट मीटर मोफत देण्यात येतो, तसेच ग्राहकांना प्रकल्पासाठी कंपनी निवडण्याची मुभा आहे.

सौर ऊर्जा स्वच्छ व पर्यावरणपूरक असून, अतिरिक्त वीज निर्मितीमुळे ग्राहकांचे देयक जवळपास शून्यावर येते, असे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले.


Related Articles

Back to top button