क्रीडाताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“कोर्टवरील विजयानंतर समाजातही गोल्ड : ज्वाला गुट्टाचे 30 लिटर स्तनदूध दान”

भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा मातृत्वानंतर समाजासाठीही ठरली गोल्डवूमन; नवजात बाळांसाठी प्रेरणादायी उपक्रम


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : भारताची माजी स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा केवळ खेळातच नव्हे तर सामाजिक कार्यातही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. नुकतीच ती मातृत्वाच्या सुखाचा अनुभव घेत आहे आणि याच काळात तिने एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे.
ज्वाला दररोज सुमारे 600 मिलीलीटर स्तनदूध सरकारी रुग्णालयांमध्ये दान करत असून, गेल्या काही महिन्यांत तिने जवळपास 30 लिटर दूध नवजात बालकांसाठी दिलं आहे. विशेष म्हणजे, ज्यांना स्वतःच्या आईचं दूध मिळू शकत नाही अशा बाळांसाठी तिचं हे योगदान अमूल्य ठरत आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, आपल्या मुलीला दूध पाजल्यानंतर उरलेले दूध ती दान करण्याचा निर्णय घेते. भारतात एखाद्या खेळाडूने अशा प्रकारचा उपक्रम सुरू केल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, आईचं दूध हे बाळासाठी अमृतासमान असून त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि एलर्जी, अस्थमा, लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
खेळातील कारकीर्द
ज्वाला गुट्टाने आपल्या बॅडमिंटन कारकिर्दीत भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत.
2010 आणि 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक
महिला दुहेरीत भारताची जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली
अश्विनी पोनप्पासोबत अनेक आंतरराष्ट्रीय सामने जिंकून टॉप-10 मध्ये स्थान मिळवलं
2011 च्या BWF विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक
2014 च्या थॉमस व उबेर कपमध्ये कांस्य पदक
खेळातून देशाला अभिमान वाटेल असे यश मिळवल्यानंतर आता ज्वालाने समाजासाठीही योगदान देण्याचा निर्धार दाखवला आहे. तिचं हे पाऊल नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Back to top button