ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“महाराष्ट्राचा पाय एक्सलेटरवर, आधीच्या सरकारचा ब्रेकवर होता” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अप्रत्यक्ष टोला

ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदेंची टीका


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई, दि. 3 : “महायुतीचा विकासाचा अजेंडा स्पष्ट आहे. आमचा पाय एक्सलेटरवर आहे; आधीच्या सरकारचा पाय ब्रेकवर होता, ब्रेक लागलेले अनेक प्रकल्प महायुती सरकारने पुन्हा सुरु केले असून आता सर्व कामे वेगाने मार्गी लागत आहेत”. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले ती

मुंबईतील महत्वाकांक्षी ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पासाठी टनेल बोरिंग मशीन (TBM) चा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पूर्वीच्या सरकारवर जोरदार टीका केली.

“महायुतीचा विकासाचा अजेंडा स्पष्ट आहे. आमचा पाय एक्सलेटरवर आहे; आधीच्या सरकारचा पाय ब्रेकवर होता.”
त्यांनी पुढे सांगितले की, ब्रेक लागलेले अनेक प्रकल्प महायुती सरकारने पुन्हा चालू केले असून आता सर्व कामे वेगाने मार्गी लागत आहेत

कार्यक्रमास विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले,
“मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा बोगदा प्रकल्प निर्णायक ठरेल. पूर्व द्रुतगती महामार्ग ते किनारी मार्ग सहज जोडले जातील. मुंबई–नवी मुंबई प्रवास अधिक जलद, सुलभ होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचेल, प्रदूषण घटेल आणि ट्रॅफिकचा ताण कमी होईल. हा प्रकल्प खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे.”

पर्यावरणीय मुद्द्यांवर बोलताना शिंदेंनी विरोधकांना टोला लगावत सांगितले,
“पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करू नका. आवश्यक तेवढीच झाडतोड केली जाते आणि विकास–पर्यावरण यांचा समतोल राखूनच निर्णय घेतो.”

राजकीय टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले,
“महायुतीतील तीनही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून आम्ही स्वतः मैदानात उतरलो.”

शिंदे यांनी पुढे काँग्रेसवर टीका करत विचारले,
“बोगस मतदानाचा आरोप करणारी काँग्रेस निवडणूक प्रक्रियेदरम्यान नेमकी कुठे होती? लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.”

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मते, ठोस निर्णयक्षमतेमुळे बोगदा प्रकल्पासह मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत आणि “महायुती सरकार मुंबईकरांच्या विकासासाठी वेगाने धावत आहे.”

…….


Related Articles

Back to top button