ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या दुचाकी बाजारात प्रीमियम ‘एंट्री’; अलिबागमध्ये ट्रायम्फचे शोरूम सुरू

नमिता मोटर्सच्या माध्यमातून प्रीमियम मोटरसायकलींचा नवा पर्याय; प्रशांत नाईक यांच्या हस्ते पहिली विक्री


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग | 

रायगडच्या दुचाकी बाजारपेठेत आता प्रीमियम मोटरसायकलींचीही दमदार एंट्री झाली आहे. अलिबाग येथे नमिता मोटर्सच्या ट्रायम्फ मोटरसायकल शोरूमचा शुभारंभ आज उत्साहात करण्यात आला. जगभरात प्रीमियम मोटरसायकलींसाठी ओळख असलेल्या ट्रायम्फ ब्रँडचे शोरूम अलिबागमध्ये सुरू झाल्याने रायगडमधील मोटरसायकलप्रेमींना या श्रेणीतील वाहनांचा स्थानिक पातळीवर नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

शोरूमचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते ट्रायम्फच्या पहिल्या मोटरसायकलची विक्री करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील वडगाव फाटा येथील नितीन पेडणेकर यांनी ट्रायम्फची पहिली मोटरसायकल खरेदी करण्याचा मान मिळवला. प्रशांत नाईक यांच्या हस्ते पेडणेकर यांना मोटरसायकलची चावी सुपूर्द करण्यात आली.

ट्रायम्फ हा ब्रिटनमधील ऐतिहासिक मोटरसायकल ब्रँड असून, आकर्षक रचना, दमदार कामगिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी त्याची ओळख आहे. पारंपरिक ब्रिटिश मोटरसायकल वारसा आणि आधुनिक रायडिंग अनुभव यांचा मेळ ट्रायम्फच्या विविध मॉडेल्समध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे अलिबागमधील शोरूमच्या माध्यमातून रायगडच्या बाजारपेठेत प्रीमियम मोटरसायकल श्रेणीला आणखी विस्तार मिळणार आहे.

नमिता मोटर्सच्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी शोरूममध्ये दर्शविलेल्या एक्स-शोरूम किमतीनुसार, स्पीड टी४ची किंमत २ लाख ८ हजार ९७१ रुपये, स्पीड ४००ची २ लाख ३४ हजार १३९ रुपये, स्क्रॅम्बलर ४०० एक्सची २ लाख ६४ हजार ९७८ रुपये, तर स्क्रॅम्बलर ४०० एक्ससीची २ लाख ९९ हजार ३३३ रुपये आहे. थ्रक्स्टनची किंमत २ लाख ७५ हजार ३३५ रुपये, तर ट्रॅकर ४००ची २ लाख ४१ हजार ८८२ रुपये आहे.

अलिबागमध्ये प्रीमियम मोटरसायकलचे अधिकृत शोरूम सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यातील ग्राहकांना वाहनांची माहिती, खरेदी आणि संबंधित सेवा स्थानिक पातळीवर मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अलिबागसह पेण, मुरुड, रोहा आणि परिसरातील मोटरसायकलप्रेमींनाही याचा लाभ घेता येणार आहे.

शोरूमच्या शुभारंभप्रसंगी ग्राहक, दुचाकीप्रेमी, व्यावसायिक आणि नागरिक उपस्थित होते. पहिल्याच दिवशी झालेली विक्री आणि नितीन पेडणेकर यांच्या रूपाने मिळालेला पहिला ग्राहक यामुळे अलिबागच्या दुचाकी बाजारपेठेत ट्रायम्फच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.

……


Related Articles

Back to top button