ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

ताम्हिणी घाटात कारच्या सनरूफमधून दगड घुसला; महिलेचा जागीच मृत्यू


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड :
ताम्हिणी घाटात झालेल्या भयावह अपघातात चालत्या कारवर डोंगरातून कोसळलेला मोठा दगड थेट कारच्या सनरूफमधून आत घुसून महिलेला ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत स्नेहल गोविंदास गुजराती (43, रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात कोंडेथर गावाजवळ माणगाव-पुणे मार्गावर घडला. पुण्याहून गोरेगाव तालुका माणगावकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी येत असताना फोक्सवॅगन कार ताम्हिणी घाटातील कोंडेथर परिसरात पोहोचताच डोंगराच्या उतारावरून मोठा दगड वेगाने खाली आला. दगड कारच्या सनरूफवर आदळून आत शिरला आणि स्नेहल गुजराती यांच्या डोक्यावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर कारतील इतरांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. माहिती मिळताच माणगाव पोलिस तसेच नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.


Related Articles

Back to top button