ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा टँकर पकडला, १.०९ कोटींचा मुद्देमाल जप्त; रायगड पोलिसांची धाडसी कारवाई


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |

कर्जत – नेरळ (जि. रायगड) येथे गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या टँकरवर रायगड पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल एक कोटी नऊ लाख 27 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी लादूराम सियाराम बिश्नोई (वय ४२, रा. रिया गुंकेबरी, ता. दोरीमन, जि. बारमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ९१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता वारे गाव हद्दीत कर्जत-मुरबाड रोडवरील कोकण किनारा हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचून टँकर (क्र. GJ-12 AW-4421) पकडला.
जप्त केलेल्या मुद्देमालात ७५० मि.ली. क्षमतेच्या EVERGREEN RESERVE WHISKY चे ४३० बॉक्स (एकूण ५,१६० बाटल्या) किंमत ₹४१,२८,०००/- आढळून आल्या, तसेच MOBI VODKA ORANGE चे १७९ बॉक्स (२,१४८ बाटल्या) किंमत ₹१५,०३,६००/- आणि MOBI VODKA GREEN APPLE चे १९० बॉक्स (२,२८० बाटल्या) किंमत १५,९६,०००/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासोबतच सुमारे २९,००,०००/- किमतीचा टँकरही जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमालाची किंमत १,०९,२७,६००/- इतकी आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिनीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.
….


Related Articles

Back to top button