ताज्या बातम्यारायगड
गावोगावी पोहोचतेय ” हेल्थ राशी मशीन” नागरिकांच्या आरोग्याची घेणार काळजी
100 तपासण्याचा रिपोर्ट मिळणार पाच मिनिटात

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : स्वातंत्र्य दिनाच्या १५ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागासाठी आरोग्यसेवेची मोठी भेट देत “आरोग्य आपल्या दारी – फिरता डिजिटल दवाखाना” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या दवाखान्याच्या माध्यमातून हेल्थ राशी मशीनच्या सहाय्याने तब्बल १०० आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत करता येणार आहेत. कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत हा फिरता दवाखाना पोहोचणार असून, गावकऱ्यांनी घरी बसल्या-बसल्या तपासणी करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. फक्त पाच मिनिटांत रिपोर्ट मिळणार असल्याने आजार ओळखण्यात व उपचार सुरू करण्यात विलंब होणार नाही.
या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, हिमोग्लोबिन, वजन, तापमान अशा महत्त्वाच्या तपासण्या सहज, जलद आणि मोफत मिळणार आहेत. 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कलावीत कालावधीत या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. 

हा उपक्रम शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा राजा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, “प्रत्येक नागरिकाने याचा लाभ घ्यावा, कारण गावोगावी फिरता दवाखाना पोहोचल्यामुळे लोकांना आरोग्य तपासणीसाठी शहरात धावाधाव करावी लागणार नाही,” असे आवाहन त्यांनी केले आहे.




