ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“पाटीवरून स्क्रीनकडे : रायगडच्या ४८ शिक्षकांनी लिहिला डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय”

PM e-VIDYA उपक्रमातून २५ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण ज्ञान – तंत्रस्नेही शिक्षकांचा मोलाचा वाटा, रायगडची शैक्षणिक कामगिरी राष्ट्रीय पातळीवर झळकली


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अविष्कार देसाई 
रायगड :  शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून बदलाचा वाहकही असतो. डिजिटल शिक्षणाच्या युगात रायगड जिल्ह्यातील ४८ तंत्रस्नेही शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.
केंद्र शासनाने सुरू केलेल्या PM e-VIDYA उपक्रमामुळे देशभरातील तब्बल २५ कोटी विद्यार्थी लाभार्थी ठरत आहेत. ग्रामीण-शहरी भागातील मुलांना घरबसल्या शिक्षण मिळावे या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२५ रोजी या उपक्रमाचे राष्ट्रीय प्रक्षेपण झाले.
‘स्टार्स’ उपक्रमात रायगडचा मोलाचा वाटा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या आदेशानुसार ‘स्टार्स उपक्रम २०२४-२५’ अंतर्गत ई-साहित्य निर्मितीचे काम हाती घेण्यात आले.
या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील ४८ शिक्षकांची निवड झाली. नियमित शालेय काम सांभाळून शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन काम पूर्ण केले. इयत्ता ६ वी व ७ वी साठी एकूण ८३ शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यात आले. पनवेल येथील स्टुडिओत रेकॉर्डिंगचे समन्वयन वृषभ जले यांनी केले.
शिक्षकांचा जिद्दीने पूर्ण झालेला प्रवास
जानेवारी २०२५ मध्ये डाएट पनवेलच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. आय. ए. इनामदार व सागर तुपे यांच्या पुढाकाराने या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
त्यानंतर शिक्षकांनी स्वतः अभ्यास करून, तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार व्हिडिओ निर्मिती केली.
अलिबागचे तज्ज्ञ शिक्षक डॉ. संदीप वारगे म्हणाले –
> “विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्याने मेहनत घेतली. या व्हिडिओंचा लाभ देशभरातील लाखो मुलांना होणार, हीच खरी समाधानाची बाब आहे.”
या प्रकल्पाचे मार्गदर्शन राजेंद्र अंबिके, सविता अष्टेकर आणि डॉ. वारगे यांनी केले.
PM e-VIDYA : डिजिटल शिक्षणाचे बहुआयामी व्यासपीठ
इयत्ता १ ते १२ पर्यंत स्वतंत्र DTH टीव्ही चॅनेल्स
DIKSHA ॲप : लाखो विद्यार्थ्यांचा आवडता नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म
SWAYAM MOOCs : शालेय व उच्च शिक्षणासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम
शिक्षा वाणी, AIR आणि कम्युनिटी रेडिओवर पॉडकास्ट प्रसारण
दृष्टिहीन व श्रवणदोषग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विशेष ई-कंटेंट
मोबाईल अ‍ॅप : ज्ञानाचा खजिना एका क्लिकवर
PM e-VIDYA मोबाईल अ‍ॅप हे विद्यार्थ्यांसाठी मोठे वरदान ठरत आहे.
३० भाषांमध्ये २०० पेक्षा अधिक DTH शैक्षणिक चॅनेल्स
९५,००० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओ पूर्णपणे मोफत
ऑफलाइन मोड, सबटायटल्स, विविध इयत्तांनुसार शोध सुविधा
पूर्णपणे जाहिरात-मुक्त आणि सुरक्षित
📲 डाउनलोड करण्यासाठी दुवे (Links):

https://play.google.com/store/apps/details?id=gov.in

Click for the Apple App:
https://apps.apple.com/in/app/pm-evidya/id6746432378

…….
👉 Android साठी क्यू आर कोड स्कॅन  करा
👉 Apple iOS साठी क्यू आर कोड स्कॅन करा
कोरोना महामारीतून शिकलेला धडा
कोरोना काळात शाळा बंद झाल्याने शिक्षण खंडित झाले होते. त्यानंतर शासनाने घरबसल्या शिक्षणासाठी पर्याय शोधले. या पार्श्वभूमीवर PM e-VIDYA हा उपक्रम संकटातील संधीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.
आज या डिजिटल पायाभूत सुविधांमुळे भविष्यकाळातही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सतत शिकण्याची नवी दालने खुली होणार आहेत.
शिक्षणाच्या नवनव्या वाटा
रायगडच्या शिक्षकांनी दाखवलेली जिद्द व तंत्रज्ञानाचा केलेला योग्य वापर हा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. २५ कोटी विद्यार्थी या उपक्रमातून लाभार्थी ठरत असताना, रायगडचा मोलाचा वाटा राष्ट्रीय अभिमान वाढवणारा ठरत आहे.

Related Articles

Back to top button