ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

आफ्रिकन ग्रे पॅरट, मकाऊची सुटका; रायगड पोलिसांचे यश


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : कर्जत येथील सेंचुरीया रिव्हाईल्ड फार्महाऊसमधून चोरी गेलेले दुर्मिळ पक्षी पोलिसांनी चेन्नईतून सुखरूप परत मिळवले आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपी अनिल जाधव याला कर्जत मधून अटक केली असून, त्याचा एक साथीदार फरार आहे.

कर्जत तालुक्यातील कशेळे येथे डॉक्टर रीना जंतकुमार देव यांचे रिव्हाईल्ड सेंचुरीया नावाचे फार्महाऊस असून, येथे विविध जातींचे दुर्मिळ पक्षी ठेवलेले आहेत. 17 जुलै रोजी या फार्महाऊसमधून आफ्रिकन ग्रे पॅरट, ब्ल्यू गोल्ड मकाऊ आणि स्कारलेट मकाऊ या पक्षांची चोरी झाली होती.

घटनेनंतर कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे चेन्नई येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांना चोरी गेलेले पक्षी मिळून आले. बाजारात या दुर्मिळ पक्षांची किंमत तब्बल 10 ते 12 लाख रुपये असल्याचे समजते.

 


Related Articles

Back to top button