ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडला नवे अपर जिल्हाधिकारी; सचिन भानुदास ढोले यांची नियुक्ती


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई |

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून सचिन भानुदास ढोले यांची रायगडच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश १८ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला.

सचिन ढोले हे यापूर्वी सह आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA), नागपूर येथे कार्यरत होते. सार्वजनिक हित आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने त्यांची रायगड येथील रिक्त अपर जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

शासनाने आदेशात संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश दिले असून, रुजू झाल्याची माहिती महसूल विभागाला ई-मेलद्वारे कळविण्याचेही सांगितले आहे. तसेच, विनापरवानगी रुजू होण्यास विलंब झाल्यास शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.


Related Articles

Back to top button