ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाने कोकणातील भाजपला नवसंजीवनी” – चित्रा पाटील

शासकीय निवास्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : “प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून आगामी राजकीय वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे. पक्षवृद्धीबरोबरच कोकणातील जनतेच्या प्रश्नांना सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी ही भेट अत्यंत फलदायी ठरली,” असे भाजपा नेत्या चित्रा पाटील यांनी सांगितले.
मुंबई येथील शासकीय निवास्थानी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग लाभल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान पक्ष संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे संघटन आणि आगामी राजकीय रणनीती या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. “प्रदेशाध्यक्ष महोदयांच्या सूचनांमुळे संघटनात्मक कार्याला निश्चितच गती मिळेल. कोकणातील जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भाजप अधिक जबाबदारीने काम करेल,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी रायगड भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, आस्वाद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या भेटीतून पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Back to top button