ताज्या बातम्यारायगड

“ईव्हीएम तपासणी सुरु – रायगड जिल्ह्यात ३ दिवसांची सखोल प्रक्रिया”


रायगड : जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी मतदान यंत्रांमधील Burnt Memory तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरु झाली आहे. ही तीन दिवसीय प्रक्रिया २१ ते २३ जुलै दरम्यान रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडत असून, रायगड जिल्हा मध्यवर्ती मतदान यंत्र वेअरहाऊस, शितोळे, पेण येथे हे तपासणीकार्य व्हिडीओ चित्रिकरणाच्या माध्यमातून पारदर्शकपणे सुरू आहे.

दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत मशीन तपासणी केली जात आहे.

या प्रक्रियेत १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रे व १९२-अलिबाग विधानसभा मतदारसंघातील ४ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिन्सचा समावेश आहे.

या ईव्हीएम मशिन्सच्या Burnt Memory ची तपासणी बेल कंपनीच्या अभियंत्यांमार्फत, संबंधित विधानसभा क्षेत्रांतील सर्व निवडणूक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जात आहे.

संपूर्ण प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबवली जात असून, यामुळे निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा अधिक मजबूत होणार आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button