ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले; शिंदे गटाची सरशी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई |

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर अखेरचा पडदा पडला असून शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते भरत गोगावले यांची रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्सीखेचीचा शेवट झाला.

पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे, तर शिवसेनेकडून भरत गोगावले हे प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा लांबली होती. अखेर राज्य सरकारने भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये ध्वजारोहण भरत गोगावले यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्यांनी सूचक शब्दांत आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले होते. आता त्यांचा तो दावा प्रत्यक्षात उतरला आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा करण्यात आली आहे.

……

 


Related Articles

Back to top button