“निसर्गही वाचवणार, विकासही साधणार! गोव्यात आदिती तटकरे यांनी मांडला “महाराष्ट्राचा मास्टर प्लॅन”
“गोव्यातील कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रीजन झोन-7 या परिषदेत तटकरे यांची आक्रमक भूमिका”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पणजी / गोवा |
“महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांवर आक्रमक आणि ठोस भूमिका घेत, किनारपट्टी राज्याच्या नात्याने शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, भक्कम पायाभूत सुविधा आणि पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण वाढीचा स्पष्ट रोडमॅप महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ठामपणे मांडला.”
गोव्यात 10 एप्रिल रोजी पार पडलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रीजन झोन -7 वेस्ट झोन परिषदेत महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याच्या विकासाचा ठाम आणि स्पष्ट अजेंडा मांडत लक्ष वेधून घेतले.
परिषदेतील चर्चांमध्ये केवळ सहभाग नोंदवण्यापुरते मर्यादित न राहता, तटकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांवर आक्रमक आणि ठोस भूमिका मांडली. किनारपट्टी असलेल्या राज्याच्या नात्याने शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, मजबूत पायाभूत सुविधा आणि पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण वाढीचा रोडमॅप त्यांनी ठामपणे पुढे ठेवला.

महाराष्ट्राच्या किनारपट्टी विकासाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विकास हा पर्यावरणाच्या किंमतीवर होणार नाही. “सस्टेनेबिलिटी हीच विकासाची खरी दिशा आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर संतुलित विकासाची गरज अधोरेखित करताना, त्यांनी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावरही जोर दिला.
पर्यटन क्षेत्राला गती देताना पर्यावरणाचा समतोल राखणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि किनारी भागातील कनेक्टिव्हिटी वाढवणे, या मुद्द्यांवर त्यांनी प्रभावीपणे मांडणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राचा विकासदृष्टीकोन केवळ प्रगतिशीलच नव्हे, तर जबाबदार आणि दूरदृष्टीचा असल्याचे स्पष्ट झाले.
तटकरे यांच्या या आक्रमक मांडणीमुळे परिषदेत महाराष्ट्राचा आवाज ठळकपणे उमटला असून, राज्याच्या भविष्यातील विकास धोरणांची दिशा स्पष्ट करणारा ठरला आहे.





