ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“जेवताना ताटाकडे बघा… मोबाईलकडे नाही!”

भाग २ – नेचरोपॅथी (निसर्गोपचार)
आजच्या काळात माणूस अन्न खाताना ताटाकडे नाही, तर मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहतो. पोट भरतंय की नाही, यापेक्षा रील संपली का याची जास्त काळजी घेतली जाते. वजन वाढलं की दोष अन्नाचा, गॅस झाला की दोष पोटाचा, आणि ताण वाढला की म्हणतो “लाइफस्टाइल अशीच आहे.” पण सारळा, अलिबाग येथील मानसशास्त्रीय निसर्गसमूपदेशक मिलिंद अनंत पाटील यांच्या मते समस्या अन्नात नाही, तर आपण अन्न कसं आणि कुठल्या मनःस्थितीत खातो यात आहे. नेचरोपॅथी वजन कमी करण्याचा चमत्कार करत नाही, ती फक्त आपल्याला जेवताना ‘सजग’ व्हायला शिकवते—आणि हाच खरा बदलाचा पहिला टप्पा आहे.
मंडळी, नेचरोपॅथीबद्दल बोललं की लोक लगेच विचारतात—
“हे सगळं केलं तर वजन कमी होतं का?”
अहो, वजन कमी करण्यासाठी नेचरोपॅथी काय करते माहीत आहे?
ती फक्त एवढंच सांगते—
“अन्न खाताय? मोबाईल बाजूला ठेवा!”
बस्स!
हे ऐकल्यावर अर्ध्यांचं वजन भीतीनंच कमी होतं!
आपल्याकडे एक नियम आहे—
“जेवण म्हणजे सण… आणि सणात लक्ष मोबाईलकडे नसतं, ताटाकडे असतं!”
पण आपण काय करतो?
पोळी हातात, लक्ष रीलमध्ये!
भाजी तोंडात, पण मन दुसऱ्याच्या स्टेटसमध्ये!
पोटाला कसं कळणार जेवण आलंय?
मग नंतर म्हणतो—
“पोट जड झालंय, गॅस झालाय!”
अरे, पोटाला वेळेवर इन्फॉर्मेशन मिळालीच नाही, तर ते काय करणार?
नेचरोपॅथी काय सांगते—
जेवताना जेवण बघा, मोबाईल नाही
खोल श्वास घ्या, डोळे बंद करून अन्नाची जाणीव ठेवा
झोपताना मोबाईलचं दर्शन नको; त्याऐवजी चंद्र, आकाश बघा—तेही फ्री आहेत
शरीराला पाण्याची गरज आहे, कोल्ड ड्रिंकची नाही
आपण सगळे आज ‘ओव्हरलोडेड’ झालोय—
डेटा ओव्हरलोड
कॅलरीज ओव्हरलोड
ताण ओव्हरलोड
आणि झोप? अंडरलोड!
नेचरोपॅथी म्हणते—
“ताण कमी करायचा असेल, तर आधी भार नाही, स्वतः हलके व्हा!”
कधी विचार केलात?
झाडाला ना डोकं असतं, ना नोकरीचा ताण.
पाय जमिनीत, हात आकाशात—म्हणून ते हिरवं असतं!
आपण?
पाय जमिनीवर नाहीत,
हात फोनमध्ये,
आणि मन Wi-Fi मध्ये!
निसर्गोपचार सांगतो—
“जरा स्वतःकडे बघा… कारण तुम्ही बदललात, तर सगळं बदलतं!”
तोच खरा रिसेट.
– मिलिंद अनंत पाटील, सारळ, अलिबाग
“मानसशास्त्रीय निसर्ग समुपदेशक”
📞 9404791798




