ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगड जिल्ह्यात १५ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित, सभापती आरक्षण सोडतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ ऑक्टोबरला विशेष सभा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

राड : ४ ऑक्टोबर २०२५

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर झाले असून, त्यासाठी ९ ऑक्टोबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाची अधिसूचना (दि. ९ सप्टेंबर २०२५) नुसार रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षणाचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.

🔹 अनुसूचित जाती – ०
🔹 अनुसूचित जाती (महिला) – १
🔹 अनुसूचित जमाती – १
🔹 अनुसूचित जमाती (महिला) – १
🔹 इतर मागास प्रवर्ग – २
🔹 इतर मागास प्रवर्ग (महिला) – २
🔹 सर्वसाधारण – ४
🔹 सर्वसाधारण (महिला) – ४

या प्रमाणे आरक्षण निश्चित करण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेस नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच प्रसारमाध्यमांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.


Related Articles

Back to top button