स्व. नमिता नाईक यांच्या स्मृतीला सेवाभावाची मानवंदना; आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना फळांचे वाटप

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलिबाग शहरातील शिवाजी पुतळा चौक येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात माजी नगराध्यक्षा स्व. नमिता प्रशांत नाईक यांच्या स्मरणार्थ विठ्ठल भक्तांना फळांचे वाटप करण्यात आले.
आदर्श मित्र मंडळ, घरत आळी यांच्यावतीने आयोजित या सामाजिक उपक्रमात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फळांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त उपस्थित होते.
या प्रसंगी रविकिरण आंबेकर, उदय तेली, सिद्धार्थ नाईक, सुशांत पाटील आणि कपिल अनुभवणे यांच्या हस्ते भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.
स्व. नमिता नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले. आषाढी एकादशीच्या दिवशी सामाजिक बांधिलकी जपत भक्तसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
…..



