ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

सातत्यपूर्ण तपासातून रायगड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी — गायब झालेले २४ मोबाईल परत


सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम

रायगड : सायबर पोलिसांनी मोठी कामगिरी करत चोरी गेलेले आणि गहाळ झालेले ३ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचे एकूण २४ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले आहेत.

या कामगिरीसाठी CEIR पोर्टल (Central Equipment Identity Register) चा वापर करण्यात आला. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत ९४४ मोबाईल फोन परत मिळवून देण्याची कामगिरी झाली असून, CEIR पोर्टलद्वारे मोबाईल शोधण्यात रायगड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या तांत्रिक कामगिरीत महिला पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल जाधव, तसेच पोलिस कॉन्स्टेबल श्रेयस शशिकांत गुरव, सहाय्यक फौजदार अजय मोहिते, म.पो.ह. सुषिता पाटील, पोहवा राजीव झिंजुर्टे, पोना तुषार घरत, पोना समीर पाटील, पोना राहुल पाटीलआणि सहकाऱ्यांनी भूमिका बजावली.

दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मोबाईल चोरी किंवा हरवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा CEIR पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी, ज्यामुळे मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढते.


Related Articles

Back to top button