क्रीडाताज्या बातम्यारायगड

धावत्या पावलांनी रायगडात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन झाले.

कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांसह मान्यवर उपस्थित होते. पाटील यांनी खेळाडूंना क्रीडेला करिअर म्हणून घ्यावे, असे आवाहन केले, तर जावळे यांनी खेळामुळे शारीरिक व बौद्धिक विकास साधतो असे सांगितले.

या निमित्ताने आयोजित ३ किमी मॅरेथॉनमध्ये शंभरहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी यांनीही या स्पर्धेत धाव घेतली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Related Articles

Back to top button