ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

१५ भाजप, १६ राष्ट्रवादी — पण गट वेगळे; रायगडमध्ये सत्तेची कोंडी भाजपचे वैकुंठ पाटील, राष्ट्रवादीकडून मधुकर पाटील यांची गटनेते पदी निवड 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग 

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 उमेदवार  निवडून आले असून त्यांनी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र गटाची नोंदणी केली.

अलिबाग येथील भाजप कार्यालयात भाजपाची बैठकीत पार पडली. सर्व सदस्यांच्या एकमताने पेण येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तथा माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली.तसेच राष्ट्रवादी गटनेते मधुकर पाटील यांची देखील निवड एकमताने करण्यात आली.

मात्र या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद सत्तासमीकरणांबाबत नवा राजकीय संकेत मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य विजयी झाले असतानाही दोन्ही पक्षांनी संयुक्त गट नोंदणी न करता स्वतंत्र नोंदणीची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने   अद्याप अधिकृत गट नोंदणी केलेली नसल्याची माहिती आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बैठकीनंतर बोलताना आमदार ठाकूर यांनी सांगितले की, जनतेने दिलेला कौल विकासासाठी असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे सर्व सदस्य एकत्रितपणे काम करतील. वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासकामांना गती देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप नेते आस्वाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित  सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Back to top button