ताज्या बातम्याराशिभविष्य
साप्ताहिक राशिभविष्य (२१ ते २७ सप्टेंबर २०५)

नवीन आठवडा म्हणजे नवे स्वप्न, नवे संकल्प आणि नव्या संधींची चाहूल. कधी आनंद, कधी कसोटी, तर कधी आशेचा किरण घेऊन ग्रह-नक्षत्रे आपले आयुष्य रंगवतात. या आठवड्यात कोणाला यशाची साथ लाभेल, कोणासाठी संयम गरजेचा ठरेल आणि कोणाला आनंदाची भेट मिळेल? प्रत्येक राशीसाठी दिलेले शुभ दिनांक हेच तुमच्या यशाचे मार्गदर्शक ठरतील.
चला तर जाणून घेऊया, ज्योतिष अभ्यासक मिलिंद पाटील (सारळ-अलिबाग) यांनी केलेले प्रेरणादायी भविष्यदर्शन…
—
मेष :- मेष राशीधारकांना जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. इतरांना मदत करण्यात पुढाकार घ्या. नोकरदारांनी कामावर व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. लहानशी चूक ही त्रासदायक ठरू शकते. मित्रवर्गाकडून दिलासा मिळेल. घरून काम करताना जागरूक राहा. साथीदाराशी प्रेमसंबंधाने वागणे हितकारक राहील. त्यांच्या मनाचा विचार करून वागा. प्रलोभनापासून दूर राहा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. आर्थिक बाजू ठीक राहील. आपणास येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.
शुभ दिनांक – २१, २३.
वृषभ :- वृषभ राशीसाठी या सप्ताहाचे ग्रहमान पाहता आपली मानसिकता बिघडणार नाही याची दक्षता घ्या. घरगुती वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. सर्वांशी जुळवून घ्या. सर्व बाबतीत आर्थिक बाजू लक्षात घेऊन हिशोबी राहण्याचा प्रयत्न करा. जागेसंबंधी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या. आदरयुक्त वागणे कायम ठेवल्यास त्याचा उपयोग होईल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाकारांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.
शुभ दिनांक – २४, २५.
मिथुन :- मिथुन राशीसाठी या सप्ताहात बेजबाबदारपणे कोणतेही कृत्य करू नका, धोका आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. इतरांमधील दोष काढण्याचे कटाक्षाने टाळा. आपल्या भावनांना आवर घालून जबाबदारपणे वागण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवल्यास आपल्याबद्दल गैरसमज होण्याचे प्रसंग टाळू शकाल. अनावश्यक खर्च टाळा, त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहील. आर्थिक बाबतीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच व्यवहार करा, जेणेकरून त्याचा योग्य परतावा आपणास मिळू शकेल.
शुभ दिनांक – २६, २७.
कर्क :- कर्क राशीधारकांस या आठवड्यात शेवटचा कालावधी उत्तम जाणार आहे. हे जरी असले तरी आततायीपणा हानीकारक ठरू शकतो. कोणतीही घाई करू नका, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. बौद्धिक चातुर्याच्या जोरावर वेगवेगळे लाभ मिळतील. मान, सन्मान, ख्याती वाढेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवहारकौशल्यामुळे फायदा होईल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवे विचार, संकल्पनांची रुजवण होईल. आगामी आठवड्यात आपल्या प्रामाणिकपणाचा फायदा होईल.
शुभ दिनांक – २१, २७.
सिंह :- सिंह राशीसाठी या आठवड्यात चिंतन-मनन लाभदायक ठरेल. भविष्याची चिंता सतावेल. अनावश्यक खर्च होतील. रागावर नियंत्रण ठेवा. आगामी आठवड्याचा काळ उत्तम असेल. प्रतिष्ठा वाढेल. प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामांमुळे वरिष्ठ अधिकारी आपले कौतुक करतील. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभाव वाढता राहील. नवीन ओळखीतून अचंबित करणारी वार्ता मिळेल. भीतीदायक स्वप्ने पडण्याची शक्यता आहे. जोडीदाराबद्दलचे प्रेम वाढेल. आर्थिक धोका पत्करू नका.
शुभ दिनांक – २२, २६.
कन्या :- कन्या राशीसाठी या आठवड्यात एखाद्या गोष्टीप्रती आकर्षण वाढेल. तरुणांच्या आयुष्यात प्रेमाचे आगमन होण्याची शक्यता आहे. आपल्या स्वभावातील गोडवा कायम ठेवा. व्यक्तिमत्त्वातील एखादा नवा पैलू उजेडात येईल, त्यामुळे आपले नाव चांगलेच चमकेल. आचरण उत्तम ठेवा. धर्म आणि अध्यात्मातील आवड वाढेल. परोपकार कराल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. पद-प्रतिष्ठेचा मार्ग प्रशस्त होईल. संगीत व ललित कलांमध्ये विशेष रस वाढेल.
शुभ दिनांक – २३, २५.
तुल :- तुला राशीसाठी या सप्ताहात बुद्धिचातुर्यात वाढ होणाऱ्या घटना घडतील. आपल्या हातून काही कामे सहज होणार असल्याने त्याचा कसा फायदा घेता येईल हे पाहणे फायद्याचे ठरेल. राहूची वक्री दृष्टी असल्याने समस्या येतील. सदाचरणावर भर द्या. धाडस वाढेल. आपले विरोधक परास्त होतील. खुल्या मनाने मदत करावी. वादविवादात विजयी व्हाल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. अवाक्याबाहेरच्या कामांमध्ये लक्ष घालू नका. आठवडा अत्यंत शुभ असणार आहे. शक्ती आणि सामर्थ्य वाढेल. वक्तृत्व क्षमता सुधारेल.
शुभ दिनांक – २४, २७.
वृश्चिक :- वृश्चिक राशीसाठी या सप्ताहात प्रभावशाली लोकांशी संपर्क होईल. त्यामुळे हा आठवडा उत्साह वाढवणारा ठरेल. सहज-सुलभ व्यवहार करता येतील. विरोधकांचे काही चालणार नाही. त्यांची अवस्था वाईट होऊ शकते. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. निरर्थक गोष्टी मनात घर करून राहतील, त्या टाळा. वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी वाढेल. एखाद्या गोष्टीत सावधगिरी बाळगा, अन्यथा निराधार आरोप होतील. या आठवड्यात नेहमीपेक्षा अधिक श्रम पडतील, त्यामुळे विश्रांती गरजेची असेल. रक्तदाब व मधुमेहाचे आजार डोके वर काढतील. विरोधक प्रभावहीन ठरतील.
शुभ दिनांक – २३, २६.
धनु :- धनु राशीसाठी या सप्ताहात संयम व जिद्द यांचा योग्य वापर केल्यास आपले ध्येय गाठता येईल. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने अनावश्यक खर्च टाळा. नोकरदारांना दिलासा मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृतीबाबत अधिक दक्ष राहा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा व मोसमी आजारांपासून सावध रहा. वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी बोलताना सावधपणे वागा. हितशत्रूंबद्दल चिंता करू नका, त्यांना गप्प बसवू शकाल.
शुभ दिनांक – २४, २७.
मकर :- मकर राशीसाठी या सप्ताहात आर्थिक बाजू ठीक राहील. मुलांना प्रोत्साहन द्या. प्रत्येक कार्यात शांतता बाळगून, विचारपूर्वक वागून निर्णय घेतल्यास हा आठवडा चांगला जाईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. आर्थिक व्यवहारात गुंतून जाणार नाही याची दक्षता घ्या. नको त्या प्रलोभनात अडकू नका. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता पथ्ये पाळा.
शुभ दिनांक – २५, २६.
कुंभ :- कुंभ राशीसाठी या सप्ताहात आपण प्रत्येक बाबतीत सांभाळून वागल्यास हा आठवडा सर्व दृष्टिने चांगला जाईल आणि हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आवडीच्या क्षेत्रात लक्ष दिल्यास लाभ व आनंद मिळेल. प्रकृती स्वास्थ्याबाबत अधिक दक्ष राहा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा व उष्णतेच्या विकारांपासून सावध रहा. सरकारी नियमांचे पालन करा. मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. त्यांच्या अध्ययनात लक्ष द्या. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
शुभ दिनांक – २६, २७.
मीन :- मीन राशीसाठी या सप्ताहात आपण मुलांशी सामंजस्याने वागल्यास घरातील वातावरण आनंदी राहील. नशिबाची साथ नसली तरी चिकाटीने आपले काम पूर्ण करू शकाल. नोकरदारांनी वरिष्ठांशी मित्रत्व राखावे. नको त्या प्रलोभनात अडकू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. मुलांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे, नाहीतर विसरभोळेपणा अभ्यासास मारक ठरू शकतो. वादाचे प्रसंग टाळा. आपल्या कामाबाबत अथवा महत्त्वाच्या गोष्टींबाबत गुप्तता पाळल्यास आठवडा चांगला जाईल.
शुभ दिनांक – २१, २३.
चेतावणी
हे राशिभविष्य हे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार केलेले सामान्य भविष्यकथन आहे. याकडे अंधश्रद्धा न ठेवता प्रेरणादायी मार्गदर्शन म्हणून पाहावे. जीवनातील यश हे केवळ नशिबावर नव्हे तर आपल्या संयम, परिश्रम आणि योग्य निर्णयांवर अवलंबून असते. आरोग्य, आर्थिक व्यवहार व महत्त्वाचे निर्णय घेताना नेहमी वास्तव परिस्थिती लक्षात घेऊनच पुढे पाऊल टाका.
हे राशिभविष्य हे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार केलेले सामान्य भविष्यकथन आहे. याकडे अंधश्रद्धा न ठेवता प्रेरणादायी मार्गदर्शन म्हणून पाहावे. जीवनातील यश हे केवळ नशिबावर नव्हे तर आपल्या संयम, परिश्रम आणि योग्य निर्णयांवर अवलंबून असते. आरोग्य, आर्थिक व्यवहार व महत्त्वाचे निर्णय घेताना नेहमी वास्तव परिस्थिती लक्षात घेऊनच पुढे पाऊल टाका.




