‘रोहन केमिकल’च्या आड ड्रग्ज माफिया – रायगड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राइक!
८९ कोटींच्या केटामाईन अंमली पदार्थाचा पर्दाफाश — चार आरोपींना अटक

महाड : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक २४ जुलै २०२५ रोजी मोठी कारवाई करत ८८ कोटी ९२ लाख २५ हजार रुपये किंमतीचा केटामाईन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी महाड एमआयडीसीमधील रोहन केमिकल प्रा. लि. या कंपनीच्या आड बेकायदेशीररित्या केटामाईन तयार केल्याचे उघड झाले आहे.
—
अंमली पदार्थ जप्तीविषयी माहिती:
जप्त अंमली पदार्थ : केटामाईन
एकूण किंमत : ₹८८,९२,२५,०००/-
घटनास्थळ : प्लॉट क्र. २६/३, मौजे जिते, एमआयडीसी, महाड, रायगड
गुन्हा दाखल तारीख : २४/०७/२०२५
गुन्हा रजि नं. : ७९/२०२५
कलमे : NDPS Act 1985 चे कलम ८(c), २२(c), २५, २७(a), २९, ४२ व BNS 2023 चे कलम ३(५)
—
अटक करण्यात आलेले आरोपी:
1. मच्छिंद्र तुकाराम भोसले, रा. जिते, ता. महाड, जि. रायगड
2. सुशांत संतोष पाटील, रा. माहोप्रे, ता. महाड, जि. रायगड
3. शुभम सदाशिव सुतार, मूळ रा. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. नांगलवाडी, महाड
4. रोहन प्रभाकर गर्वस, रा. मालाड (प.), मुंबई
—
कारवाईची पार्श्वभूमी:
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा अलिबागचे पोनि मिलींद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची रचना करण्यात आली. या पथकांनी दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या बेकायदेशीर केमिकल निर्मितीवर लक्ष ठेवून, अखेर दिनांक २३ जुलै रोजी छापा टाकून ही यशस्वी कारवाई केली.
—
कारवाईत सहभागी पथक:
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे
स्थानिक गुन्हे शाखा, रायगड
अँटी-नार्कोटिक्स सेल, मुंबई
महाड, महाड शहर व पोलादपूर पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी
—
या कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे यांनी कारवाई पथकाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.