क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा कूच बिहार ट्रॉफी सामना — महाराष्ट्राचा धावांचा डोंगर


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : रिलायन्स स्टेडियम, नागोठणे येथे सुरू असलेल्या कूच बिहार ट्रॉफी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र संघाने दमदार खेळ करत ओडिशावर दडपण आणले आहे. दोन दिवसांच्या खेळाच्या समाप्तीनंतर महाराष्ट्राने पहिल्या डावात ५२८ धावा फलकावर लावत सामना आपल्या पकडीत घेतला आहे.

महाराष्ट्राच्या सलामीवीर जक्षन सिंहने तडाखेबाज फलंदाजी करत १३ चौकार आणि एका षटकारासह १०२ धावा करत शतक ठोकलं. त्यानंतर मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू सुवाशिक जगतापने १३ चौकार आणि एका षटकारासह ११७ धावा करत ओडिशाच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला.

ओडिशाच्या गोलंदाजांमध्ये अर्पित मोहंतीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर राझ यादव आणि रुद्र मलिक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात ओडिशाने सावध सुरुवात केली असून दिवसअखेर ३ बाद १३४ धावा केल्या आहेत. स्वागत मिश्रा ४२ धावा, तर बिश्वजीत प्रधान २८ धावांवर नाबाद आहेत. महाराष्ट्राकडून अर्कम सय्यद आणि अभिनंदन अडक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात महाराष्ट्राचे प्रशिक्षक इंद्रजीत कामतेकर आणि संघ व्यवस्थापक राहुल अरवाडे यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या माजी क्रिकेटपटू व मुख्य निवड समिती सदस्यांनी मैदान, खेळपट्टी आणि व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले.


Related Articles

Back to top button