ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

दिवेआगरच्या समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदीच्या विनर्स अकॅडमीतील ४८ जणांच्या पर्यटन दौऱ्यावर काळाचा घाला; सर्व मृत विद्यार्थी १६ वर्षांचे


 

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

श्रीवर्धन |

आळंदी, पुणे येथील विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th या अकॅडमीच्या पर्यटन दौऱ्यावर आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. समुद्रात पोहत असताना आठही विद्यार्थी बुडाले. बचाव पथकाच्या शोधमोहीमेनंतर सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळून आले आहेत. या दुर्घटनेने आळंदी आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.

रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनर्स अकॅडमीचे २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक असे एकूण ४८ जण दिघी सागरी, दिवेआगर येथील समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. समुद्रकिनारी विद्यार्थी पोहत असताना ही दुर्घटना घडली. अचानक आलेल्या लाटांमुळे किंवा समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने विद्यार्थी अडचणीत सापडल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
मृत विद्यार्थ्यांची नावे
रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
तन्मय दत्तात्रय वहीले
सुमित भरत अहिरे
प्रणव रामदास बनसोडे
कैवल्य सतीश वासनकर
राजवीर युवराज वहीले
यश किरण वानखेडे
सोहम तुकाराम भांडवलकर
कौस्तुभ संदीप दौंड
मृत सर्व विद्यार्थी १६ वर्षांचे असून आळंदी, पुणे येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एकाच अकॅडमीतील आठ विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने या दुर्घटनेने पालक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पर्यटनासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी समुद्रातील धोकादायक परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे.

……


Related Articles

Back to top button