क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“बुल्स आयच्या शोधात महाराष्ट्र… नेमबाजीला मिळालं लीगचं व्यासपीठ”

१७ ते १९ एप्रिल दरम्यान पुण्यात रंगणाऱ्या या लीगमध्ये १८ जिल्ह्यांचे संघ आणि १४४ खेळाडू सहभागी 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
पुणे |
क्रिकेट, कबड्डी, फुटबॉलच्या गदारोळात शांतपणे, पण अचूक निशाणा साधत महाराष्ट्रात एक वेगळीच क्रीडा क्रांती आकार घेत आहे. ‘शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्र’ ही फक्त स्पर्धा नाही, तर राज्यातील नेमबाजीला ग्लॅमर, गती आणि गाठ देणारी नवी सुरुवात ठरत आहे.
१७ ते १९ एप्रिल दरम्यान पुण्यात रंगणाऱ्या या लीगमध्ये १८ जिल्ह्यांचे संघ आणि १४४ खेळाडू सहभागी झाले आहेत. पण या आकड्यांपेक्षा महत्त्वाचं आहे ते बदलतंय ते चित्र. नेमबाजी आता केवळ निवडक खेळ राहिलेला नाही, तर जनतेच्या जवळ येऊ लागला आहे.
पूर्वी नेमबाजी म्हटलं की महागडा खेळ, मर्यादित सुविधा आणि काही मोजके खेळाडू असं चित्र होतं. मात्र या लीगमुळे पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर संघ तयार झाले आहेत.यामुळे गावागावातून प्रतिभा पुढे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंजली भागवत, राही सरनोबत, सुमा शिरूर, तेजसविनी सावंत यांसारखे दिग्गज थेट मार्गदर्शक म्हणून मैदानात उतरले आहेत. हे केवळ उपस्थिती नाही, तर “अनुभवाचा ट्रान्सफर” आहे. जो नवोदित खेळाडूंसाठी अमूल्य ठरणार आहे.
नेमबाजी आता “टीव्हीवर पाहायचा” खेळ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. खरा अँगल ही स्पर्धा नाही, ही ‘इकोसिस्टम’ आहे. या लीगमुळे तीन मोठे बदल घडताना दिसत आहेत. त्यामध्ये तळागाळातील खेळाडूंना संधी, चाहते आणि खेळाडू यांच्यात थेट कनेक्शन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा स्पष्ट मार्ग
महाराष्ट्रात आता फक्त धावांचा खेळ नाही…
“टार्गेट” साधणाऱ्यांची नवी पिढी तयार होतेय!
आज ही लीग आहे…उद्या कदाचित याच मैदानातून भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज तयार होईल आणि लक्षात ठेवा
इथे आवाज कमी आहे… पण लक्ष्य अचूक आहे!
…..

Related Articles

Back to top button