ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ अलिबागामध्ये महिलांच्या पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद!”

भाजप महिला मोर्चा पदयात्रेचा नियोजित मार्ग बदलल्यामुळे गोंधळाची स्थिती; संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा महिलांना पडला विसर


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  |
नारिशक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने अलिबाग येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचे नेतृत्व भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष ॲड. मनस्वी मोहिते यांनी केले. सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून पद यात्रेला सुरुवात करण्यात आली. महावीर चौक मार्गे बालाजी नाका येथील काळंबा देवी मंदिर येथे पदयात्रेची सांगता झाली आणि त्यानंतर पदयात्रेचे सभेत रूपांतर झाले. या वेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
पदयात्रेदरम्यान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महिलांसाठी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करण्यात आले. विविध घोषणांनी अलिबाग शहर दुमदुमून गेले.
मात्र, या पदयात्रेदरम्यान नियोजित मार्ग अचानक बदलण्यात आल्याने काही महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून जाणारा मार्ग ठरलेला असताना तो बदलण्यात आल्यामुळे पुतळ्याला अभिवादन करण्यास महिला पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही, अशी चर्चा रंगली.
दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना भाजपा पदाधिकारी ॲड. महेश मोहिते यांनी सांगितले की, महिलावर्ग दुपारपासून उपस्थित असल्याने वेळेअभावी नियोजित मार्गात बदल करण्यात आला.
_____________

भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या राजकीय आरक्षणाचा भक्कम संवैधानिक पाया निश्चितच घातला. संविधानातील कलम 14 द्वारे समानतेचा हक्क, कलम 15 द्वारे भेदभावविरोध आणि विशेषतः कलम 15(3) द्वारे महिलांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. यामुळे पुढे महिलांसाठी राजकीय आरक्षण लागू करण्याचा मार्ग कायदेशीरदृष्ट्या खुला झाला हे कधीच विसरता येणार नाही.

……


Related Articles

Back to top button