“शेंडा-बुडका नसलेलं विधेयक, राजकीय हेतू दिसतो”
उद्धव ठाकरे यांचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध;

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, या विधेयकामागे राजकीय हेतू आहे आणि याचा गैरवापर होऊ शकतो.
“नक्षलवाद संपत आलाय, मग कायद्याची गरज का?” असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांनी हे विधेयक ‘मिसला टाडा’ असल्याचे म्हणत, या कायद्यात नक्षलवादाचा कुठेही थेट उल्लेख नसल्याची टीका केली. “कडव्या डाव्या विचारसरणी”चा उल्लेख असून त्याआधारे कुणालाही ताब्यात घेण्याचा धोकाही ठाकरे यांनी अधोरेखित केला.
ठाकरे यांनी सरकारवर आरोप केला की, भाजपविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी विचारले, “कडवे डावे म्हणजे नक्की कोण?” तसेच, कायद्याची व्याख्या स्पष्ट नसल्याने याचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जाऊ शकतो, असे मत मांडले.
….
ठाकरे यांनी स्पष्ट केले की देशविघातक शक्तींविरोधात सरकारसोबत उभे राहण्यास त्यांना हरकत नाही. मात्र, यामागे राजकीय हेतू असल्यास विरोध होणारच. “जनसुरक्षेच्या नावाखाली उद्या कोणीही तुरुंगात जाईल,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.