ताज्या बातम्या
मांडवा भराव प्रकरणी तहसिलदारांनी दिले चाैकशीचे आदेश

लाेढा अलिबाग निवासी प्रकल्पाविराेधात स्थानिक एकवटले
रायगड ः अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे लाेढा अलिबाग या निवासी प्रकल्पासाठी भराव करण्यात येत आहे. या प्रकरणी माता टाकादेवी मच्छिमार संस्थेने भरावा विराेधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली हाेती. त्या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अलिबाग तहसिलदार यांनी या प्रकरणी मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करुन वस्तुस्थितीबाबत याेग्य चाैकशी करावी आणि याेग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सातत्याने तक्रारी हाेत असल्याने जणरेट्यापुढे आता जिल्हा प्रशासनला कायदेशिर कारवाई करणे क्रमप्राप्त झाले आहे.
लाेढा अलिबाग हा निवासी प्रकल्प मांडवा येथे 140 एकर जमीनीवर प्रस्तावित आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात येत आहे. भरावामुळे खारफुटी वनस्पतीचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. भरावाचा त्रास ग्रामस्थांना हाेत आहे. याबाबतची तक्रार मांडवा येथील माता टाका देवी मच्छिमार संस्थेने मुख्यमंत्री, जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन अॅक्शन माेडमध्ये आले आहे. या प्रकरणी अलिबागचे तहसिलदार विक्रम पाटील यांनी सारळ गावच्या मंडळ अधिकाऱ्याला चाैकशी करण्याचे आदेश 20 जुन 2025 च्या पत्रान्वये दिले आहेत.
100 एकरहून अधिकच्या जमिनीवर भराव करण्यात येत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. मांडवा येथील प्रमुख रस्त्यावरुन कंपनीने सुरु केलेले काम दिसून येते. तसेच हा भराव बेकायदा असून मांडवा परिसरातील अन्य गावांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. अशा तक्रारींचा खच प्रशासनाकडे पडला असल्याचे तहसिलदार कार्यालयाने स्पष्ट केले. त्यामुळे तक्रारी हाेत असताना प्रशासनाकडून काेणतीच कारवाई का हाेत नाही, असा सवाल माता टाका देवी मच्छिमार संस्थेने केला आहे.
दरम्यान, सारळ गावचे मंडळ अधिकारी या प्रकरणी काेणती कार्यवाही करतात हे पाहणे आैस्तुक्याचे ठरणार आहे.
. . . . .