ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

काशीदच्या किनाऱ्यावर ‘ड्रग गोणी’; समुद्रातून चरसचं काळं सोनं बाहेर

काशीद समुद्रकिनारी चरस सापडला; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त


मुरुड : पोलिसांनी गुरुवारी एका मोठ्या अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला आहे.  पोलिसांना काशीद समुद्रकिनारी सुमारे ११.१४८ किलो चरस जप्त केला आहे. या अंमली पदार्थाची एकूण किंमत रु. ५५,७४,०००/- इतकी आहे.
ही कारवाई ३१ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. एका संशयास्पद प्लास्टिकच्या गोणीत सदृश अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मुरुड पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात ही गोणी चरसने भरलेली असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ५०/२०२५ नोंदवण्यात आला असून, कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(क), २२(क) अंतर्गत कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  परशुराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
तपासणी व कारवाईमध्ये अविनाश पाटील, जनार्दन गवळे, हरी मेंगाळ, मकरंद पाटील, धनखील सुते, कैलास धनमसे, संतोष मराडे आणि सुदाम उकाडे यांचा मोलाचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button