“राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त अलीबागमध्ये ‘पवित्र दान’ कार्यक्रमाचे आयोजन”

रायगड : भारत सरकारने ३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अवयवदान दिन’ म्हणून घोषित केला आहे. कारण ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती. त्यानिमित्ताने दरवर्षी हा दिवस अवयवदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.या
विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदान, नेत्रदान, त्वचादान यावर भर दिला होता. महाराष्ट्र शासनानेदेखील ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान अवयवदान जनजागृती पंधरवडा जाहीर केला आहे.
या उपक्रमांतर्गत ‘फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन’ ही संस्था ३ व ४ ऑगस्ट २०२५ रोजी अलीबाग (जि. रायगड) येथे “पवित्र दान” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. समाजातील विविध स्तरांतील कार्यकर्ते, आरोग्यसेवा कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आदींसाठी हे दोन दिवसीय स्वतंत्र सत्र असून अवयवदान व देहदानाच्या जनजागृतीचे कार्य या निमित्ताने राबवले जाणार आहे.
प्रमुख आयोजक : कुमार कदम – मुख्य समन्वयक, फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन, शिरीष तुळजुळे – संचालक, कमळ सेवा संस्था, प्रकाश सोनावळेकर – अध्यक्ष, अलीबाग प्रेस असोसिएशन