ताज्या बातम्यारायगड

महिलांसाठी आरोग्य व स्वसंरक्षण कायदा विषयक सेमिनार नवगाव-गुंजीस येथे संपन्न


अलिबाग :  रायगड टिमच्या नियोजित कार्यक्रमांतर्गत एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि ह्युमन राईट्स इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी “आरोग्य व महिला स्वसंरक्षण कायदा सेमिनार” या विशेष उपक्रमाचे आयोजन रविवार, २० जुलै २०२५ रोजी करण्यात आले.

या सेमिनारमध्ये नवगाव-गुंजीस येथील महिल बचत गटातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना सत्यनिष्ठेची शपथ देण्यात आली, ज्यामुळे सामाजिक जागरूकतेचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला.

या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एड. निता विजय कदम यांनी उपस्थित राहून महिलांना आरोग्य आणि कायद्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रेखा म्हात्रे व प्रिया कर्णिक यांनी विशेष पुढाकार घेऊन उत्कृष्ट नियोजन केले. रायगड टिमचे पदाधिकारी व सदस्यांनी देखील आपल्या योगदानाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमासाठी नॅशनल चिफ सेक्रेटरी धनंजय म्हात्रे यांनी विशेष मार्गदर्शन केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button