क्रिकेट पंच म्हणून महिला घडविण्याचा ऐतिहासिक उपक्रम!
MCA कडून महिलांसाठी पहिली पंच परीक्षा; रायगड जिल्ह्यात नोंदणीस सुरुवात

क्रीडा प्रतिनिधी:
महिला क्रिकेट क्षेत्रात पंच म्हणून संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्यावतीने येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात प्रथमच फक्त महिलांसाठी पंच प्रशिक्षण व परीक्षा आयोजित केली जात आहे. ही परीक्षा लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तीन टप्प्यांत होणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पात्र महिलांना राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनेलमध्ये सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक आजी-माजी महिला खेळाडू, तसेच क्रिकेट जाणकार महिलांनी १८ जुलैपर्यंत पुढील लिंकवर नोंदणी करावी:
👉 https://forms.gle/NY7oBwvkobyT4ukKA
नोंदणी शुल्क: ₹५९०
परीक्षेपूर्वी ऑगस्ट महिन्यात ८ दिवसांचा ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रशिक्षण कोर्स घेतला जाईल. त्यानंतर ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस परीक्षा पार पडेल.
या उपक्रमासाठी संपर्क:
जयंत नाईक (सहसचिव): 📞 9561099735
ॲड. पंकज पंडित (सदस्य): 📞 8149252829
शंकर दळवी: 📞 9422594414
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी इच्छुक महिलांनी संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.