ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धोकादायक ठिकाणी अडकलेल्या पर्यटकाची ‘यशवंती हायकर्स’च्या मदतीने सुखरूप सुटका!




खोपोली : मुंबईच्या अंधेरी (पूर्व) येथून पर्यटनासाठी खोपोली येथे आलेल्या प्रियांशू गेडाम (वय २०) या तरुणाची के. पी. वाॅटरफाॅल येथे एकट्याने जाण्याच्या प्रयत्नात अडकल्याने शोधमोहीम राबवावी लागली.

के. पी. वाॅटरफाॅल हे ठिकाण जितके सुंदर तितकेच धोकादायकही आहे. खडतर चढाई, निसरडी पायवाट आणि वेगाने वाहणारे ओहोळ पार करत जावे लागते. अशा ठिकाणी नवख्यांनी एकट्याने जाणे टाळावे, असा स्थानिकांचा सल्ला असतो.

प्रियांशू गेडाम रस्ता चुकून भरकटला आणि अडचणीत सापडला. त्याने तत्काळ मदतीसाठी एम.एम.आर.सी. मदत केंद्राशी संपर्क साधला. समन्वयक राहुल मेश्राम यांनी यशवंती हायकर्स खोपोलीचे मार्गदर्शक श्री. पद्माकर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.

श्री. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ शोधपथक रवाना झाले आणि काहीच वेळात प्रियांशूपर्यंत पोहोचून त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

शोध मोहिमेत सहभागी सदस्य:
१. पद्माकर गायकवाड
२. प्रणित गावंड
३. निखिल गुरव
४. अभिजित देशमुख
५. अजय फाळे
६. अतुल तेलंगे
७. शुभम पाटील
८. कुणाल पाटील

‘यशवंती हायकर्स खोपोली’च्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे एक मोठा अपघात टळला असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button